Saturday, December 10, 2016

कुतुहूल..

२-३ वर्षापूर्वी एक पुस्तक हातात पडलं.. वाचायला घेतलं एवढं interesting होत कि एका रात्रीत वाचून काढलं.. माणसाचा जन्म उत्क्रांती मधून झाला, कि बायबल/कुराण प्रमाणे देवांनी इव्ह अँड आदाम याना पृथ्वीवर पाठवून त्यातून बाकीचे लोक्स तयार झाले कि बाहेरच्या ग्रहावरून येऊन पृथ्वीवर मानवाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केले..
अजून एक विशेष नेहमी वाटत आले आहे कि धार्मिक ग्रंथामध्ये माणसाचा जन्म कसा झाला याचा उहापोह केला आहे.


आता सर्वात जास्त विशेष विष्णू अवताराचे वाटते.. डार्विन नि जो सिद्धांत मांडला तो सिद्धांत बहुतेक हिंदू ग्रंथा मधून चोराला असावा.. बघा ना विष्णूचा पहिला अवतार "मत्स्य" अवतार (जलचर) आहे आणि डार्विन पण काय सांगतो समुद्री जीव सर्वप्रथम तयार झाले त्यानंतर हळूहळू जीवांमध्ये उत्क्रांती होऊन माणूस तयार झाला.. मग कासव अवतार (उभयचर), वराह अवतार (स्थळ चर), नरसिंह अवतार (अर्धा पुरुष, अर्धा सिंह), वामन अवतार (उंचीने बारीक मनुष्य), परशुराम (आक्रमक अवतार), राम (पूर्ण पुरुष, शांत, संयमी), कृष्णा (पुरुषोत्तम म्हणजे शांत आणि चालू, संयमी आणि राजकारणी, कूटनीती करणारा) अशी उत्क्रांतीची थेअरी आपल्या धर्मात हजारो वर्षापूर्वी मांडली होती पण डार्विन नि जास्त विस्तृत मांडून त्याच नाव अजरामर झालं..

कृष्णा नंतर बौद्ध अवतार आहे असं म्हणतात पण ते काय खरं वाटत नाही कारण राम शांत, संयमी होता, कृष्णा शांत, चालू, संयमी तसेच कूटनीतिक होता, म्हणजे त्यानंतरच version अपग्रेडेड पाहिजे होत पण तस नसून ते अजूनच शांत, अहिंसावादी झालं.. म्हणजे बहुतेक पुढची version downgrade असतील. आता कल्की पण येणार आहे म्हणत आहेत कलियुगात कल्की येणार आणि तो माणसाचं एकदम अपडेटेड version असणार आहे..तर हिंदू आणि डार्विनचा सिद्धांत एकदम मिळताजुळता आहे.. आणि कुराण/बायबल मध्ये डायरेक्ट देवांनी एक स्त्री, एक पुरुष पाठवून माणसे तयार झाली असं सांगितलं आहे.. या प्रकारचा सिद्धांत मी जे पुस्तक वाचले होते त्यात मांडला आहे.. माणूस हा मुळात पृथ्वीवरचा प्राणी नाही असा सिद्धांत त्यात आहे.. दुसऱ्या ग्रहावरून कोणी परग्रहवासी आले आणि त्यांनी इथं त्यांची लोकसंख्या वाढवली आणि परत त्यांच्या ग्रहावर गेले.. असे परग्रहवासी कधी कधी पृथ्वीवर येऊन त्यांच्या बांधवाना शिक्षण द्यायचे, कसे जगायचे, कसे वागायचे, काय खायचे याचे शिक्षण द्यायचे.. जे परग्रहावरून यायचे त्यांना पृथ्वीवरचे त्यांचे बांधव देव, गॉड, रब अशा वेगवेगळ्या नावानी हाक मारायचे.. जेव्हा पृथ्वीवरचे लोक स्वतः सगळं शिकू शकतात याची जेव्हा खात्री झाली तेव्हा परग्रहवासी पृथ्वीवर यायचे बंद झाले.. अनेक ठिकाणी केलेल्या उत्क्रांती मधून हे सिद्ध पण झालं आहे कि आजच्या टेकनॉलॉजि ला पण शक्य नाही अशी काही निर्मिती त्यावेळी मानवाने केली आहे.. आणि ते हि खूप कमी वेळात तर हे त्यावेळच्या अडाणी माणसाला शक्य कसं झालं? पिरॅमिड सारखी मोठी मोठी स्मारकं २० वर्षात बांधली ते हि आजच्या architect / engineer ला शक्य नाही अशा फॉरमॅट मध्ये..

काही ठिकाणी देवाची चित्र काढली आहेत, कि ते विमानात बसून यायचे आणि त्यांना डोक्यावर शेंडी असायची वैगरे.. तर ती शेंडी नसून अँटेना असायचा आणि विमान म्हणजे space shuttle असायचे.. तर अशा प्रकारच्या अनेक शक्यता त्या पुस्तकात पडताळून पहिल्या आहेत..
विमानासाठी प्राचीन रन वे सापडले आहेत, न गंजणार लोखंड, मोठी मोठी (१ दगड हजार टन वजनाचा) दगड एकदम मापात सुरेख कातून बनवलेले मंदिरं, स्मारकं, २६ लाख असे दगड एकमेकांवर रचून बनवलेले पिरॅमिड...  सोन, हिरे, चांदी यांची refinement करून त्यापासून बनवलेले कलाकुसरीचे दागिने.. हडप्पा, मोहोंदारो सारखी आधुनिक नगर.. आताच्या कॉम्पुटर ला पण २०-२० आकडी गुणाकार, भागाकार करता येत नाही पण त्यावेळेस च्या माणसांनी ते अचूक करून ठेवले आहेत.. तर हे सर्व कोणामुळे शक्य झालं? आधुनिक माणूस तर आता ६०-७० वर्षापूर्वी तयार झाला.. विमानाचा शोध ९०-१०० वर्षांपुवीचा, संगणक येऊन ४०-५० वर्ष झाली.. मग अशा आधुनिक गोष्टी प्राचीन काळी नसताना सुद्धा मानवाने एवढी मोठी मोठी निर्मिती केली कशी असा प्रश्न आपल्याला पडतो ना?

अजून एक इंटरेस्टिंग म्हणजे मांजर जातीत वाघ, बिबट्या, सिंह, चित्ता, मांजर असे प्राणी आहेत.. श्वान जातीत कुत्रा, लांडगा, कोल्हा असे प्राणी आहेत.. अश्व जातीत घोडा, गाढव, झेब्रा, खेचर हे प्राणी आहेत.. सरपटणारे जातीत पाल, मगर, घोरपड, सरडा असे प्राणी आहेत.. वानर जातीत माकड, गोरिला आहेत.. पक्षी जातीत पोपटाच्या बऱ्याच जाती आहेत, कबुतर सारख्या दिसणाऱ्या अनेक जाती आहेत.. आणि हे सगळे प्राणी बुद्धीने, चालण्याने, बोलण्याने अजून तरी माणसाच्या जवळपास पोहचले पण नाहीत.. माणूस हा प्राणी एकटाच वेगळा आहे पृथ्वीवर.. त्यामुळं असं वाटत कि माणूस बाहेर गाव वरून आलेला पाहुणा आहे आणि इथेच येऊन राहीला.. त्यानी इथे आपलं वर्चस्व प्रस्थपित केलं... अशी सगळी गुपित माणूस उलघडून काढेलच.. आपल्या हयातीत उलगडली तर बरच आहे तेवढंच सगळे doubts क्लिअर होतील..

पुस्तकाचं नाव आहे पृथ्वीवर माणूस उपराच..
खालील लिंक वर हे पुस्तक उपलब्ध आहे..
https://docs.google.com/file/d/0B0eSjwJSKnHjSnNtMEVoM1hrbkU/edit?pli=१ 

No comments:

Post a Comment

हा ब्लॉग राजकीय, सामाजिक चालू घडामोडी, विनोदी किस्से, ललित कथा, टोमणे या साठी आहे.. वाचा, आवडलं, नाही पटलं, तर कंमेंट्स करा.. तुमच्या कंमेंट्स अपेक्षित आहेत.. धन्यवाद..!