जीवन खूप गोष्टीनी भरलेलं आहे आणि या अनेक गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत ते आपल्याला कळत नाही.. अशीच एक बसल्या बसल्या बनवलेली गंमतीशीर गोष्ट :-
आपण रोज जेवतो, जेवताना ताटात मेन कोर्स असतो भाजी, चपाती, भात वरण आणि गोड धोड.. तोंडी लावायला असत मीठ, लोणचं, कोशिंबीर, ठेचा इतकं आणि जिभेचे चोचले पुरवणार बरच काही.. स्टार्टर असतो पापड, सूप इत्यादी. मी स्टार्टर; मेन कोर्स असल्या सारखं हादडतो.. आता जेवायचं ताट आणि आयुष्यातली कोणती गोष्ट कुठं कनेक्ट होते याचा मी संबंध लावतोय.. पटलं तर डोक्यावर घ्या आणि नाही पटलं तर हलकेच घ्या..
आपल्या आयुष्यात कुटुंब, काका, मावशी, आत्या, शिक्षक, गुरु तसेच गल्लीतले मित्र, शाळेतले मित्र, क्लास मधले मित्र, कॉलेज चे मित्र, ऑफिस मधले मित्र, शाखेतले मित्र.. या सगळ्यांचा आपल्यावर प्रभाव असतो.. आयुष्याच्या प्रत्येक phase मध्ये नवीन नवीन लोक्स भेटतात.. काही बरोबर राहतात काही निघून जातात.. काही चांगले असतात काही वाईट असतात.. काही वाईट असून पण हवेहवेसे वाटतात काही चांगले असून पण कडू वाटतात.. काही शिव्या देतात काही व्यसन करतात.. काही चहा पाजतात काही नेहमी आपल्याच पैशातून चहा पितात.. अशी सगळी लोक्स भेटतात, मित्र होतात, काही कुटुंबातले एक (फॅमिली फ्रेंड) होतात.. काही रिलेटिव्ह होतात.. तर असा सगळं कुटुंब कबिला घेऊन आयुष्यभर जगत असतो..
आता जेवणाचं ताट आणि आयुष्यात येणारे लोक्स यांचा काय संबंध लागतो का ते बघू..
रोज जर आपण लोणचं, कोशिंबीर एवढंच खाल्लं तर काय होईल..? किंवा कधी आपण भाजी चपाती वरण भात शिवाय दुसरं काही खाल्लंच नाही तर काय होईल? जेवणात असलेल्या पदार्थ मध्ये मीठच नसेल तर काय होईल? स्वीट डिशचच रोज जेवण केलं तर काय होईल? तर आपल्या पोटाची वाट लागेल.. पोट खराब होईल आणि लवकरच आरोग्य पूर्णपणे बिघडेल.. असच आपल्या आयुष्यात येणारे लोकांचं असत.. भाजी चपाती भात वरण हे मोठे पदार्थ असतात ते आपण जास्त प्रमाणात खातो.. आणि ते जास्त खाल्ले तर आरोग्य वर काही परिणाम घडत नाही.. उलट आरोग्य उत्तम राहत..
चटणी, लोणचं, स्वीट आपण कमी प्रमाणात खातो आणि हे जास्त प्रमाणात खाल्ले तर ऍसिडिटी, पित्त, लठ्ठपणा आणि अजून काय काय होईल सांगता येत नाही..
तर आपलं कुटुंब हे भाजी चपाती भात वरण सारखं असत.. हे रोज ताटात येणारे पदार्थ असतात.. हे पदार्थ नसतील तर ताट अपूर्ण..
लोणचं, कोशिंबीर, गोड पदार्थ हे भेटणारे मित्र असतात.. हे जर ताटात नसतील तर जेवणाला चव येत नाही..
मीठ म्हणजे शिक्षक आणि गुरु.. (मीठ वरून घ्यायचं नसत म्हणतात.. याचा काय संबंध लागतोय का बघा.. :-P )
तर असं भरलेलं ताट प्रत्येकाकडे असावं आणि पदार्थांचा योग्य प्रमाणात आस्वाद घेतलेला बरा.. नाहीतर चव लागावी म्हणून नुसतं लोणचं आणि चटणीच खात बसलो तर भाजी चपाती चिडतील तसेच नुसतं लोणचं आणि कोशिंबीर खाल्ली तर पित्त होईल किंवा तेलकट लोणचं खोकला येण्याचं निम्मित होईल.. भाजी चपाती आरोग्या साठी चांगली म्हणून नुसते तेच खाल्लं तर तोंडी लावायचे पदार्थ दुर्लक्षित होतील आणि मग आयुष्य बेचव होईल.. तर असं ताट भरून जेवण केलं तर आयुष्य सुंदर आणि आरोग्य उत्तम राहील..
पटलं नाहीतर हलकेच घ्या.. परत एकदा आठवण करून दिली.. :-)

अप्रतीम !! चल एक कटींग पाज ;-) :-)
ReplyDeleteधन्यवाद ..!! चहा आरोग्यास हानिकारक असतो..
ReplyDelete