Thursday, August 20, 2009

याला जीवन ऐसे नांव ...........

याला जीवन ऐसे नांव ...........

टी.व्ही चालू करा, रेडियो लावा अन्यथा वर्तमानपत्र वाचा अगदी ठीक ठिकानिच्या भिंतीवर पहा 'स्वांइन फ्लू' कही केल्या पाठ सोडत नव्हता मागील पूर्ण आठवड़ा सर्वांच्या चर्चेत एकाच विषय 'स्वांइन फ्लू ' .शहरात सर्वत्र स्वांइन फ्लू नामंक राक्षस दहशत माजवत होता .त्याचा आतंक दिवसेंदिवस वाढत होता .या सगळ्यात अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना, पक्ष, प्रसिद्दि माध्यमे आणि कही जण वयक्तिक मदत आपापल्या परींन करीत होते .त्यातच राजकीय पक्ष या संधीचा पुरेपुर फायदा करण्यात मागे पडले नाहीत ; तसे स्वांइन फ्लू यांच्या पथ्यावर पडलेला खुप मोठा राक्षस पण असू शकतो .असो !
मी सुद्धा असेच एका स्वयंसेवी संस्थे तर्फे डॉ। नायडू हॉस्पिटल मधे स्वयंसेवक म्हणुन कार्यरत होतो। अगदी चार तासच तिथे होतो। अगदी हॉस्पिटल मधे आत नव्हतो पण बाहेर मदतकेंद्र उभे केले होते तिथे येणार्या रुग्नना, नातेवाइकना किंव्हा नागरीकाना नायडू चा पत्ता सांगणे, चहा देने, बिस्कीट देने यांसारखे मदतकार्य करत होतो. माजे काही सहकार्यांची तेथील रुग्नंच्या नातेवाइकंशी ओळख जाली होती त्यातील एका लहान मुलीचे वडिल पाहून मनात चर्र~र~ जाले. खरेतर त्याना पाहिल्यावर कोणीही सांगेन की हा मानुस फार गरीब असेन; त्यातच त्यांचा हळवा स्वभाव; का याच लोंकावर देव घाला घालित असतो. खरेच तय काकांना पाहून मनात असंख्य प्रश्न उभे राहिले; पण मी काहीच करू शकत नहीं या जाणिवेने शांत राहिलो आणि उगीचच काहीतरी विचार मनात येण्यासाठी प्रयत्न करत राहिलो. त्याच क्षणी असे वाटले की आता लगेचच उठावे आणि या सर्व परिस्थितिशी एकहात करावा. नंतर ते विचार हळउच विरून गेले.
काही वेळाने मी तेथून निघालो व् जवळ च्याच बस थाब्यावर बसची वाट पाहत थाबालो. तिथे दोन स्त्रियांचे अशलील गोष्ठीवर फोनवर बोलने चालू होत ते एकुनच तेथून मी काढता पाय घेतला व घरी चालत जाऊ या विचारने घरी जाण्याच्या मार्गावर चालायला लागलो. अगदी दोन मिनटच्याच अंतरावर पुणे स्टेशन आले. पुणे स्टेशन तसे पुणे शहरातील मध्यवर्ती ठिकान. तेथे आल्यावर आजुबाजुचे निरिक्षण केले. सर्व काही अगदी निरखून पाहत होतो. तेथे पोहचल्या बरोबर काही गारूद्यांचा खेल पाह्न्यास मिळाला. हा खेल अगदी फसवा आणि लोकांवर कुसंस्कार करणारा असतो. त्याचे असे आहे की, हा खेल दाखावनारे दोन मनुष्य लोकांचे आपल्या संभाक्षण कोशल्याने लक्ष रोखून ठेवतात त्यातच मधेच प्रेक्षकनमधून एका माणसाला पुढे बोलवतात (खरेतर तो त्यांचाच साथीदार असतो) तो सुद्धा त्यांच्या इतकाच संभाक्षण कोशाल्यत माहिर असतो. तो त्याना काही प्रश्न विचारतो मग ते दोन मनुष्य लिंबामधून आग वैगरे दाखवतात व लोकांकडून पैसे काढतात. त्याना ताबीज नामक कसलासा प्रकार दाखवतात तो विकत घेतल्यावर तुमचे कल्याण होइल असा सन्देश देतात. जो सुसिक्षित वाटत असेल त्याला हट्क्तात व बाकिंच्या कडून हवे तेवढे पैसे घेवून त्यांच्या कानात काहीतरी कुजबुज करतात. असा प्रकार सर्रासपणे पुणे स्टेशनवर पाहायला मिळतो. तो कार्यक्रम पहिल्यानंतर मी पुढे चालू लागलो. दुहेरी रस्ता आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुस पाहिले तर पदपथ कुठे तरी हरवला आहे असे वाटते. दोन्ही बाजुच्या पद्पथावर अतिक्रमने आहेत. मोबाइल अक्सेसरिस, वृतपत्र विक्रेत, पानाच्या टपरी, चहाची टपरी यांसारख्यानी पदपथ शुसोभित जालेला नजरेस पडला. मद्येच एक दोन तृतीय पंथी त्यांच्या विचित्र हालचाली वरुण आपले लक्ष वेधून घेतात. पुढे गेल्यावर काही होटल्स, वाइसराय, गुडलक यांसारख्या बेकर्या आपल्या दृष्टीस पडतात. काही पान टपर्यांच्या बाहेर काही तरुण धुर सोडत असताना दिसतात. अगदी एटीत त्यांचे तोंडातून धुर सोड़ने चालू असते व त्यांच्या कड़े पाहिले तर 'आमदनी अठानी खर्चा रूपया ' याचा प्रत्यय आल्या शिवाय राहत नाही व किवही येते. पुढे आल्यावर स्टेशन दिसले. तेथे प्रवाशांची गड़बड़ दिसून येते. कोणी रिक्शातुन उतरत आहे, कोणी रिक्शावाल्यंशी टेरिफवरुन भांडत आहे. तेथूनच एकेरी रस्ता सुरु होतो. एक रस्ता ससुनकडे जातो व दूसरा मालधक्याकड़े जातो. रस्ता ओलंडन्यासाठी भुयारी मार्ग केला आहे. पण तिथे ट्रेवल एजेंटचीच गर्दी जास्त दिसते. मुंबई ~मुंबई~नागपुर असे ओरडत ते येणार्या जानार्याला विनाकारण त्रास देत असतात. भुयाराच्या कडेने चालायला लागले की सर्वत्र दुर्गन्ध येत असतो. तय भुयारात कोपर्या कोपर्यावर थूकुन भिंतीला लाल रंग विना शुल्क दिलेला आहे असे वाटते. तेथून बाहेर पडले तर कडेने मिठाइची दुकाने, ट्रेवल्स ची दुकाने नजरेस पडतात आणि पुढे गेल्यावर पीएमपीएल च्या बसेस उभ्या केलेल्या दिसतील. त्यातील किती बसेस वेळेवर सुटतात हे सांगणे फार कठिन. त्याच्याच बाजूला निळ्या, पांढर्य गाड्या तोर्यात उभ्या असतात. त्या गाड्यावर COOL CAB, PUNE MUMBAI PUNE अशी अक्षरे नजरेस पडतात. त्यांचा तिथे सर्रासपणे बाजार मांडलेला दिसतो. पुढे गेल्यावर अतिशय भयानक दृश दृष्टीस पड़ते. तो भाग म्हणजे ससून हॉस्पिटल चा परिसर. तिथे आल्यावर मला नरकात आलो आहे असे वाटते. तिथे एकेरीच वाहतुक आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला पद्पथावर काही झोपडी दादानी किंव्हा परप्रान्तातिल बाधवानी छानपैकी कपड्यांची दुकाने मांडलेली दृष्टीस पडतात. रस्त्याच्या डावीकडे पद्पथावर चार-पाच ठिकाणी पावलाच्या अंतरावर अश्श्लिल पुस्तके, सीडी विकताना दिसतात. त्यानी बेकायदेशीर विक्री करण्याचा परवाना मिलवलेला आहे असे वाटते. पुढे गेल्यावर वजनकाटा, मोजे विकणारे दृष्टीस पडतात त्यांची आरोली कानात एकच सन्देश देवून जाते की, 'हे करने आम्हाला भागच आहे; यावरच आमचे पोट आहे .' पुढे गेल्यावर एक मानुस अंगप्रदर्शन करत पहुडला आहे. त्याच्या आजुबजुस खरकट अन्न. पानी अस्ताव्यस्त पडल आहे ते पाहून किळस येते व भरतीला आलेल्या लाटा किनार्यावर येवून आदळव्या तसे विचार मनात आपटत राहतात आणि लाटा नंतर विरून जावून त्यामगुन नवी लाट यावी तसे एकमेकांवर ढकलत त्याच्या मागुन येत राहतात.
एकंदरीत हे सर्व पाहिल्यावर या समाजाच, भारतभुमिचे काय होणार? एकीकडे कॉर्पोरेट क्षेत्रात एवढी प्रगति चालू आहे आणि दुसरीकडे अत्यंत हलाखीची परिस्तिती. अनेक प्रश्न मनात तयार होतात आणि मनात अचानक एका कवितेची ओळ स्पर्श करून जाते 'याला जीवन ऐसे नाव.........'
अक्षय डाके, पुणे