Spiritual Science


                      आध्यात्मिक शास्त्र हा विषयच खूप नाजूक असा आहे. या विषयी बोलायचे झाले तर ज्याच्या कडे या शास्त्र चा अनुभव आहे . त्यानेच बोललेले बरे ! पण माझ्यात झालेल्या बदला विषयी मला आध्यात्माचा मोलाचा वाट आहे असे वाटते. देवपूजा करणे, पोथी-पुराण वाचणे म्हणजेच अध्यात्म न्हवे!
                      मानवी शरीरात अचानक घडणारे बदल, अचानक येणारी समज, मनावर होणारे अद्भुत परिणाम, लोकांचा वेगळा वाटणारा सहवास आणि अनेक गोष्टी कि ज्या मानवी शरीरावर आणि मनावर बदल घडवून आणतात आणि हे सध्या करायचे असेल तर त्याला अध्यात्मा शिवाय पर्याय नाही. मोक्ष मिळणे, आत्मज्ञान प्राप्त होणे, उच्चतेची समज प्राप्त होणे, वाणीत मधुरता येणे, डोळे तेजस्वी होणे, चेहऱ्यावर तेज प्राप्त होणे, परमानंद प्राप्त होणे अशाप्रकारे बदल हे घडत असतात. हे बदल नकळत घडत असतात. अनेक चांगल्या विचारांचा संग्रह तयार होतो, ते विचार समजा पर्यंत पोह्चावावेत असे वाटू लागते, लोक संग्रह विचार पटल्यामुळे वाढू लागतो. असे हे अध्यात्म अनेक गोष्टींचा मिळून झालेला एक मोठा विषय आहे.
                    शक्ती पात होणे हि एक आत्मज्ञान व मोक्ष मिळवण्याची एक साधी सोपी वाट आहे. पण शक्तिपात घडवून आणणे हे काही साधे सोपे नाही. त्याला एका चांगल्या गुरूची आणि अति उच्च साधनेची गरज असते. तसे मोक्ष मिळणे व आत्मज्ञान प्राप्त करण्यासाठी अनेक योग सांगितले आहेत. हटयोग, शक्तिपात योग, अनेक प्रकारच्या साधना आहेत. पण हे सध्या करायचे असेल तर हटयोग वैगरे हे मार्ग सामान्य माणसाला झेपणारे नाही. त्यासाठी सिद्धमहायोगशास्त्र अर्थात शक्तिपातयोगरहस्य सांगितले आहे. मी या विषय वरील वामन गुळवणी महाराजांचे शिष्य श्री. जोशी यांचे  सिद्धमहायोगशास्त्र अर्थात शक्तिपातयोगरहस्य हा ग्रंथ वाचला आहे. त्या ग्रंथाला संघाचे द्वितीय सरसंघचालक प.पु.माधव सदाशिव गोळवलकर (श्री गुरुजी ) यांची प्रस्तावना लाभली आहे. त्यात त्यांनी सुद्धा हेच म्हटले आहे कि , "हा विषय अतिशय नाजूक असा आहे". 
                    संत ज्ञानदेवांना हे शक्तिपात योग रहस्य त्यांच्या वडील बंधूनी अर्थात निवृत्ती नाथानी सांगितले होते. आणि निवृत्तीनाथाना हे रहस्य गहीनिनाथानी सांगितले होते. असा या शक्तिपात योग रहस्य चा प्रसार देवादीदेव महादेव यांच्या पासून आजतागायत सुरु आहे. 
                    कलियुगात अनेक संत काळानुसार होवून गेले आणि या पुढे होत राहतील. काळानुसार म्हणायचे कारण असे कि आपल्या लक्षात येईल कि कलियुगाच्या सुरुवातीपासून जे संत होवून गेले जे त्यांच्या शक्ती नुरूप, भक्ती नुरूप, साधने नुरूप, लोकांना मार्गदर्शन करत होते. आद्य शंकराचार्यान पासून ते आज घडीचे जे काही संत आहेत त्याने आपापल्या परीने. समजेने लोकांमध्ये एक प्रकारची भक्ती, भाव, समज जागृत केली. धर्माचे अधिष्ठान सांगितले आणि वेळोवेळी धर्म संकटात सापडला असताना त्यातून बाहेर पडण्याचे सामर्थ्य लोकांत जागृत केले. संत ज्ञानदेव, संत तुकाराम, संत एकनाथ, समर्थ रामदास, स्वामी समर्थ, गजानन महाराज, संत तुकडोजी महाराज असे अनेक संत कलियुगाच्या प्रारंभा पासून जन्म घेत राहिले आणि समाजा मध्ये परिवर्तन करून मोक्ष पावले.      
                    संस्कृती हा किती मोठा विषय आहे हे आपल्या आताच्या राष्ट्र चालकांना माहित नसावा. म्हणून संस्कृती या गोष्टीला ते शत्रू समजून दूर लोटतात. पूर्ण जगाला बदलवून टाकण्याचे सामर्थ आपल्या संस्कृतीत आणि जीवन पद्धतीत आहे. तर आधुनिकतेचे जोड देवून आपल्या संस्कृतीला जर आपण उचलून धरले तर आपण विश्व गुरु पदी विराजमान झाल्या शिवाय राहणार नाही हे अटळ सत्य गेले कित्येक शतके आपले साधू संत सांगत आलेले आहेत. आपण अनेक शास्त्रात पारंगत आहोत आणि या आधी हजारो वर्ष पूर्वी आपण अनेक शास्त्रे जगापुढे मांडली. पण दुर्देवाने आपण त्या गोष्टी गमावून बसलो आहोत. आणि पाश्च्यात्यांच्या अनेक शोध, सवयी, जीवन पद्धती त्यांच्या कौशल्य पूर्ण मार्केटिंग मूळे आपणावून जडून घेत आहोत. आपण सुद्धा आपली संस्कृती, शोध, जीवन पद्धती लोकांसमोर कौशल्यापूर्ण मांडूयात. आणि आपली जगा समोर एक वेगळी ओळख निर्माण करूयात.   
                    असे हे अध्यात्म शास्त्र जे काही मला माहित आहे आणि जे काही मला अनुभवता आले आहे, ते मी वेळोवेळी येथे सादर करेन.