Thursday, May 11, 2017

दुनिया

दुनिया गोल आहे खरी पण तिचे कोन अनेक
दुनिया साधी आहे खरी पण तिचे चेहरे अनेक
नाती, गोती आणि सारा संसार म्हणजे ही दुनिया
तू तिचा आणि तुझी ती कधीच नाही अशी हि दुनिया..


दुनिया बेरंग वाटते खरी पण तिचे रंग अनेक
दुनिया अबोल वाटते खरी पण तिच्या भाषा अनेक
अपेक्षा आणि स्वप्ने म्हणजे हि दुनिया
तू तिचा आणि तुझी ती कधीच नाही अशी हि दुनिया..


दुनिया संथ वाटते खरी पण तिला वेग अनेक
दुनिया करीब वाटते खरी पण तिचे अंतर अनेक
प्रश्न उत्तराचा खेळ म्हणजे हि दुनिया
तू तिचा आणि तुझी ती कधीच नाही अशी हि दुनिया..


दुनिया आपली वाटते खरी पण इथे मतलबी अनेक
दुनिया सुखी वाटते खरी पण इथे आक्रोश अनेक
सुख दुःखाचा डोंगर म्हणजे हि दुनिया
तू तिचा तुझी ती कधीच नाही अशी हि दुनिया..

- आशुतोष मगदूम

No comments:

Post a Comment

हा ब्लॉग राजकीय, सामाजिक चालू घडामोडी, विनोदी किस्से, ललित कथा, टोमणे या साठी आहे.. वाचा, आवडलं, नाही पटलं, तर कंमेंट्स करा.. तुमच्या कंमेंट्स अपेक्षित आहेत.. धन्यवाद..!