Saturday, December 10, 2016

कुतुहूल..

२-३ वर्षापूर्वी एक पुस्तक हातात पडलं.. वाचायला घेतलं एवढं interesting होत कि एका रात्रीत वाचून काढलं.. माणसाचा जन्म उत्क्रांती मधून झाला, कि बायबल/कुराण प्रमाणे देवांनी इव्ह अँड आदाम याना पृथ्वीवर पाठवून त्यातून बाकीचे लोक्स तयार झाले कि बाहेरच्या ग्रहावरून येऊन पृथ्वीवर मानवाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केले..
अजून एक विशेष नेहमी वाटत आले आहे कि धार्मिक ग्रंथामध्ये माणसाचा जन्म कसा झाला याचा उहापोह केला आहे.


आता सर्वात जास्त विशेष विष्णू अवताराचे वाटते.. डार्विन नि जो सिद्धांत मांडला तो सिद्धांत बहुतेक हिंदू ग्रंथा मधून चोराला असावा.. बघा ना विष्णूचा पहिला अवतार "मत्स्य" अवतार (जलचर) आहे आणि डार्विन पण काय सांगतो समुद्री जीव सर्वप्रथम तयार झाले त्यानंतर हळूहळू जीवांमध्ये उत्क्रांती होऊन माणूस तयार झाला.. मग कासव अवतार (उभयचर), वराह अवतार (स्थळ चर), नरसिंह अवतार (अर्धा पुरुष, अर्धा सिंह), वामन अवतार (उंचीने बारीक मनुष्य), परशुराम (आक्रमक अवतार), राम (पूर्ण पुरुष, शांत, संयमी), कृष्णा (पुरुषोत्तम म्हणजे शांत आणि चालू, संयमी आणि राजकारणी, कूटनीती करणारा) अशी उत्क्रांतीची थेअरी आपल्या धर्मात हजारो वर्षापूर्वी मांडली होती पण डार्विन नि जास्त विस्तृत मांडून त्याच नाव अजरामर झालं..

कृष्णा नंतर बौद्ध अवतार आहे असं म्हणतात पण ते काय खरं वाटत नाही कारण राम शांत, संयमी होता, कृष्णा शांत, चालू, संयमी तसेच कूटनीतिक होता, म्हणजे त्यानंतरच version अपग्रेडेड पाहिजे होत पण तस नसून ते अजूनच शांत, अहिंसावादी झालं.. म्हणजे बहुतेक पुढची version downgrade असतील. आता कल्की पण येणार आहे म्हणत आहेत कलियुगात कल्की येणार आणि तो माणसाचं एकदम अपडेटेड version असणार आहे..



तर हिंदू आणि डार्विनचा सिद्धांत एकदम मिळताजुळता आहे.. आणि कुराण/बायबल मध्ये डायरेक्ट देवांनी एक स्त्री, एक पुरुष पाठवून माणसे तयार झाली असं सांगितलं आहे.. या प्रकारचा सिद्धांत मी जे पुस्तक वाचले होते त्यात मांडला आहे.. माणूस हा मुळात पृथ्वीवरचा प्राणी नाही असा सिद्धांत त्यात आहे.. दुसऱ्या ग्रहावरून कोणी परग्रहवासी आले आणि त्यांनी इथं त्यांची लोकसंख्या वाढवली आणि परत त्यांच्या ग्रहावर गेले.. असे परग्रहवासी कधी कधी पृथ्वीवर येऊन त्यांच्या बांधवाना शिक्षण द्यायचे, कसे जगायचे, कसे वागायचे, काय खायचे याचे शिक्षण द्यायचे.. जे परग्रहावरून यायचे त्यांना पृथ्वीवरचे त्यांचे बांधव देव, गॉड, रब अशा वेगवेगळ्या नावानी हाक मारायचे.. जेव्हा पृथ्वीवरचे लोक स्वतः सगळं शिकू शकतात याची जेव्हा खात्री झाली तेव्हा परग्रहवासी पृथ्वीवर यायचे बंद झाले.. अनेक ठिकाणी केलेल्या उत्क्रांती मधून हे सिद्ध पण झालं आहे कि आजच्या टेकनॉलॉजि ला पण शक्य नाही अशी काही निर्मिती त्यावेळी मानवाने केली आहे.. आणि ते हि खूप कमी वेळात तर हे त्यावेळच्या अडाणी माणसाला शक्य कसं झालं? पिरॅमिड सारखी मोठी मोठी स्मारकं २० वर्षात बांधली ते हि आजच्या architect / engineer ला शक्य नाही अशा फॉरमॅट मध्ये..

काही ठिकाणी देवाची चित्र काढली आहेत, कि ते विमानात बसून यायचे आणि त्यांना डोक्यावर शेंडी असायची वैगरे.. तर ती शेंडी नसून अँटेना असायचा आणि विमान म्हणजे space shuttle असायचे.. तर अशा प्रकारच्या अनेक शक्यता त्या पुस्तकात पडताळून पहिल्या आहेत..




विमानासाठी प्राचीन रन वे सापडले आहेत, न गंजणार लोखंड, मोठी मोठी (१ दगड हजार टन वजनाचा) दगड एकदम मापात सुरेख कातून बनवलेले मंदिरं, स्मारकं, २६ लाख असे दगड एकमेकांवर रचून बनवलेले पिरॅमिड...  सोन, हिरे, चांदी यांची refinement करून त्यापासून बनवलेले कलाकुसरीचे दागिने.. हडप्पा, मोहोंदारो सारखी आधुनिक नगर.. आताच्या कॉम्पुटर ला पण २०-२० आकडी गुणाकार, भागाकार करता येत नाही पण त्यावेळेस च्या माणसांनी ते अचूक करून ठेवले आहेत.. तर हे सर्व कोणामुळे शक्य झालं? आधुनिक माणूस तर आता ६०-७० वर्षापूर्वी तयार झाला.. विमानाचा शोध ९०-१०० वर्षांपुवीचा, संगणक येऊन ४०-५० वर्ष झाली.. मग अशा आधुनिक गोष्टी प्राचीन काळी नसताना सुद्धा मानवाने एवढी मोठी मोठी निर्मिती केली कशी असा प्रश्न आपल्याला पडतो ना?

अजून एक इंटरेस्टिंग म्हणजे मांजर जातीत वाघ, बिबट्या, सिंह, चित्ता, मांजर असे प्राणी आहेत.. श्वान जातीत कुत्रा, लांडगा, कोल्हा असे प्राणी आहेत.. अश्व जातीत घोडा, गाढव, झेब्रा, खेचर हे प्राणी आहेत.. सरपटणारे जातीत पाल, मगर, घोरपड, सरडा असे प्राणी आहेत.. वानर जातीत माकड, गोरिला आहेत.. पक्षी जातीत पोपटाच्या बऱ्याच जाती आहेत, कबुतर सारख्या दिसणाऱ्या अनेक जाती आहेत.. आणि हे सगळे प्राणी बुद्धीने, चालण्याने, बोलण्याने अजून तरी माणसाच्या जवळपास पोहचले पण नाहीत.. माणूस हा प्राणी एकटाच वेगळा आहे पृथ्वीवर.. त्यामुळं असं वाटत कि माणूस बाहेर गाव वरून आलेला पाहुणा आहे आणि इथेच येऊन राहीला.. त्यानी इथे आपलं वर्चस्व प्रस्थपित केलं... अशी सगळी गुपित माणूस उलघडून काढेलच.. आपल्या हयातीत उलगडली तर बरच आहे तेवढंच सगळे doubts क्लिअर होतील..

पुस्तकाचं नाव आहे पृथ्वीवर माणूस उपराच..
खालील लिंक वर हे पुस्तक उपलब्ध आहे..
https://docs.google.com/file/d/0B0eSjwJSKnHjSnNtMEVoM1hrbkU/edit?pli=१ 

Wednesday, December 7, 2016

आयुष्य ताट(ठ)..

जीवन खूप गोष्टीनी भरलेलं आहे आणि या अनेक गोष्टी एकमेकांशी संबंधित आहेत ते आपल्याला कळत नाही.. अशीच एक बसल्या बसल्या बनवलेली गंमतीशीर गोष्ट :-


आपण रोज जेवतो, जेवताना ताटात मेन कोर्स असतो भाजी, चपाती, भात वरण आणि गोड धोड.. तोंडी लावायला असत मीठ, लोणचं, कोशिंबीर, ठेचा इतकं आणि जिभेचे चोचले पुरवणार बरच काही.. स्टार्टर असतो पापड, सूप इत्यादी. मी स्टार्टर; मेन कोर्स असल्या सारखं हादडतो.. आता जेवायचं ताट आणि आयुष्यातली कोणती गोष्ट कुठं कनेक्ट होते याचा मी संबंध लावतोय.. पटलं तर डोक्यावर घ्या आणि नाही पटलं तर हलकेच घ्या..

आपल्या आयुष्यात कुटुंब, काका, मावशी, आत्या, शिक्षक, गुरु तसेच गल्लीतले मित्र, शाळेतले मित्र, क्लास मधले मित्र, कॉलेज चे मित्र, ऑफिस मधले मित्र, शाखेतले मित्र.. या सगळ्यांचा आपल्यावर  प्रभाव असतो.. आयुष्याच्या प्रत्येक phase मध्ये नवीन नवीन लोक्स भेटतात.. काही बरोबर राहतात काही निघून जातात.. काही चांगले असतात काही वाईट असतात.. काही वाईट असून पण हवेहवेसे वाटतात काही चांगले असून पण कडू वाटतात.. काही शिव्या देतात काही व्यसन करतात.. काही चहा पाजतात काही नेहमी आपल्याच पैशातून चहा पितात.. अशी सगळी लोक्स भेटतात, मित्र होतात, काही कुटुंबातले एक (फॅमिली फ्रेंड) होतात.. काही रिलेटिव्ह होतात.. तर असा सगळं कुटुंब कबिला घेऊन आयुष्यभर जगत असतो..

आता जेवणाचं ताट आणि आयुष्यात येणारे लोक्स यांचा काय संबंध लागतो का ते बघू.. 





रोज जर आपण लोणचं, कोशिंबीर एवढंच खाल्लं तर काय होईल..? किंवा कधी आपण भाजी चपाती वरण भात शिवाय दुसरं काही खाल्लंच नाही तर काय होईल? जेवणात असलेल्या पदार्थ मध्ये मीठच नसेल तर काय होईल? स्वीट डिशचच रोज जेवण केलं तर काय होईल? तर आपल्या पोटाची वाट लागेल.. पोट खराब होईल आणि लवकरच आरोग्य पूर्णपणे बिघडेल.. असच आपल्या आयुष्यात येणारे लोकांचं असत.. भाजी चपाती भात वरण हे मोठे पदार्थ असतात ते आपण जास्त प्रमाणात खातो.. आणि ते जास्त खाल्ले तर आरोग्य वर काही परिणाम घडत नाही.. उलट आरोग्य उत्तम राहत..
चटणी, लोणचं, स्वीट आपण कमी प्रमाणात खातो आणि हे जास्त प्रमाणात खाल्ले तर ऍसिडिटी, पित्त, लठ्ठपणा आणि अजून काय काय होईल सांगता येत नाही..

तर आपलं कुटुंब हे भाजी चपाती भात वरण सारखं असत.. हे रोज ताटात येणारे पदार्थ असतात.. हे पदार्थ नसतील तर ताट अपूर्ण..
लोणचं, कोशिंबीर, गोड पदार्थ हे भेटणारे मित्र असतात.. हे जर ताटात नसतील तर जेवणाला चव येत नाही..
मीठ म्हणजे शिक्षक आणि गुरु.. (मीठ वरून घ्यायचं नसत म्हणतात.. याचा काय संबंध लागतोय का बघा.. :-P  )

तर असं भरलेलं ताट प्रत्येकाकडे असावं आणि पदार्थांचा योग्य प्रमाणात आस्वाद घेतलेला बरा.. नाहीतर चव लागावी म्हणून नुसतं लोणचं आणि चटणीच खात बसलो तर भाजी चपाती चिडतील तसेच नुसतं लोणचं आणि कोशिंबीर खाल्ली तर पित्त होईल किंवा तेलकट लोणचं खोकला येण्याचं निम्मित होईल.. भाजी चपाती आरोग्या साठी चांगली म्हणून नुसते तेच खाल्लं तर तोंडी लावायचे पदार्थ दुर्लक्षित होतील आणि मग आयुष्य बेचव होईल.. तर असं ताट भरून जेवण केलं तर आयुष्य सुंदर आणि आरोग्य उत्तम राहील..

पटलं नाहीतर हलकेच घ्या.. परत एकदा आठवण करून दिली.. :-)

Monday, December 5, 2016

होली काऊ आणि इटालियन चिऊची गोष्ट

एक होती काऊ आणि एक होती चिऊ. 
काउच घर होत तिच्याच शेणाच, चिउच घर होत इटालियन मेणाच. 
एकदा काय झाल कि - मतांचा मोठ्ठा पाउस पडला त्यात शेण कालवून काऊ न तिच्यासाठी टुमदार गोठा बांधला. वासरांच्या गळ्यात घंटा बांधल्या. बैलोबांचि शिंगे रंगवली आणि होली काऊ तिच्या गोठ्यात परिवारासह राहू लागली. त्यात माजलेले वळू होते, उत्साही वासरे होती आणि हंबरणार्या वात्सल्य पुर्ण गायी सुद्धा होत्या. होली काऊ चे प्रेमळ डोळे भरून आले.

मग काय झाल इटालियन चिउचा उन्हाळा सुरु झाला. अंगाची लाही लाही होऊ लागली . तीन डोक्यात राख घालून घेतली होती. त्यामुळे विचार सुचेना. अक्कल चालेना. मग इटालियन चिउताइने काऊ च्या घरी धडक मारली …

चिऊ : होलि काऊ … होली काऊ दार उघड .
काऊ : थांब मी माझ्या बाळाला संस्कार करते .

चिऊ : होलि काऊ … होली काऊ दार उघड - होलि काऊ … होली काऊ दार उघड..
काऊ : थांब मी माझ्या बाळाला संस्कार करते.

चिऊ : होलि काऊ … होली काऊ दार उघड - "नायतर " - मी तुझं घर पाडून टाकते..
काऊ : बर मग ?

चिऊ चिडून चिडून उडुन जाते . गोष्ट संपली .


तात्पर्य : चिमण्या कामाच्या नाहीत . गरुड हवेत .