Wednesday, June 3, 2009



६ जून हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणुन साजरा केला जातो। पण या वर्षी हा दिवस ५ जून या तारखेला आला आहे। तिथि नुसार हा दिवस साजरा केला जातो। छत्रपति शिव रायांचा राज्याभिषेक या शुभ तारखेला पार पडला तसेच या दिवसा पासून शिव राज शके हे वर्ष सुरु केले म्हणुन या दिवसाला शिवराज्याभिषेक दिन तसेच हिंदू साम्राज्य दिन म्हणुन संबोधले जाते । या दिवशी रायगडा वर लाखो शिवसैनिक शिवराज्याभिषेक दिन साजरा करायला येतात। आपण पण हिंदू रक्षण करण्यासाठी शिवराज्याभिषेक दिन साजरा करुयात। या दिवशी शिवराया सारखे निर्भय, साहसी, प्रेमळ ,बुद्धिमान होण्याचा संकल्प करुयात। आणि पुन्हा स्वराज्यासाठी शिवराया कड़े साकडे घालुयात । देशात चाललेल्या दहशत वादी कृत्याची आठवण ठेवून शिवरायाने जसे अफज़ल खानला मारले अगदी तसच आपण पण हा दहशत वाद मोडून काढूयात आणि पुन्हा एकदा हिंदुस्तान हिंदू साठीच आहे हे सर्व जगाला सांगूयात । जय शिवराय !!!

निश्चयाचा महामेरु । बहुत जनाशी आधारु ॥

अखंड स्थिती चा निर्धारु । श्रीमंत योगी ॥