पृथ्वीवर लग्न हा विषय लय हार्ड आहे.. दुसऱ्या ग्रहावर असं काही असेल असं वाटत नाय , असला तरी प्रेम, ठरवून आणि लिव्ह इन असं काही असेल असं वाटत नाय. आता विषय राहतो वादाचा या पैकी बेस्ट ऑपशन कुठला? तर याला पण काय तात्विक आधार नाय. असला तरी तो लोक्स त्यांच्या त्यांच्या हिशोबानी हाच बेस्ट असा घेतात.
आता विज्ञान science शास्त्र काय सांगत बघू :-
प्रेम उत्पन्न होयला दोन्ही बाजू (पंटर आणि आयटम) यांच्या हार्मोन्स च्या उद्दीपन चा काळ एकच पाहिजे म्हणजे दोघे पण घोड्यावर स्वार पाहिजे एकाच घोडं जरी अडलं तर मग फिस्कटलं.
त्यामुळं दोघांचा घोडा कसा पळतोय यावर ते असत.. बरं दोन्ही घोडे फास्ट असतील तर जिथं पर्यंत पाहिजे तिथं पर्यंत पोचला कि रेस जिंकली. त्यानंतर ज्याच्या त्याच्या समजुतीनं पुढं जाऊ शकतात.. म्हणजे प्रेमात दोन्ही घोडे तर्रर्रर्रर्र पाहिजे नाहीतर रेस हरली. या रेस मध्ये सध्या खूप लोक्स आपले घोडे पळवत आहे. संख्या शास्त्रनुसार हाच विषय मोठा अवघड होऊन जातो. हार्मोन्स उदिप्त असले तरी १० (इथं चॉईस साठी माझी आवडती संख्या १० तुम्ही ४२ ९० १०० पण घेऊ शकता) पैकी १ लाच निवडायचा असतो (संस्कार वाले पोर असं करतात; नाहीतर १० पैकी १० ची पण सध्या चलती आहे).
इथे ऑपशन कमी आणि त्रास जास्त असतो, १०तुन १, मग १काला रोज २ तास भेट.. ४ तास व्हाट्सएप, विक मधून १दा जम्माडी जम्मत गम्माडी गम्मत, ५००-१००० ची लाल पत्ती असा सगळा संख्या शास्त्रचा नियम इथं येतो. हा सगळा लफडा कशा साठी हार्मोन्स उदिप्त झाले म्हणून त्यांना शांत करण्यासाठी..
ठरवून केलेला विवाह तर लय भलताच प्रकार आहे (हा फक्त उरलेल्या सिंगल लोकांसाठी असतो आणि ज्यांचे घोडे वर अडतात ते पण)
इथं शास्त्र science विज्ञान आधी येत नाही. इथं कॉमर्स आधी येत. बघा बघी, कांडा पोहे, देवाण घेवाण, इम्पोर्ट एक्स्पोर्ट असले प्रकार इथं सुरुवातीला असतात.. त्यानंतर हार्मोन्स वैगरे.. आणि हा प्रकार सगळं ठरवून प्लांनिंग नि केला जातो. जेवढं प्लांनिंग जोरात तेवढा success रेट जबरी. ब्रेक इव्हन पॉईंट आला कि सगळं काही सुरळीत चालू.. प्रॉडक्ट/ प्रोडक्टस तयार असतात.. हा एक सेलेकशन फंडा आहे.. सिलेक्शन जमलं तर कंपनी जोरात चालू राहते..
लिव्ह इन मध्ये असं काय नसत.. प्रेम नाय ठरवून नाय नुसता टाईमपास.. हार्मोन्स उदिप्त झाले कि भेट शांत झाले कि दे कल्टी असा साधा सोपा फंडा.. मनात आला कि भेटायचं चहा कॉफे वर काम भागत.
आता निसर्गानी जस जमल तस सगळ्या प्राण्यांना लग्न चा विषय सोपवला आहे.. माणूस सोडला तर सगळे प्राणी लिव्ह इन मध्ये राहतात.. कुठलीही कंमिटमेन्ट नाही, भाजी साडी दागिने पगार वरून भांडण नाही, तूला माझी नखपॉलिश आवडली नाही तुझं माझ्या वर प्रेम नाही असला कुठलाही फालतूपणा नाही, लग्नाचा खर्च नाही सगळं कस सुट्टं सुट्टं..
आता जास्त मीठ खाल्लं तर चांगलं नाही आणि कमी खाल्लं तर आयोडीन मिळत नाही त्यामुळे मधला मार्ग काय तर थोडं खा.. बघा आपला हिशोब कुठं लागतोय ते
-- मी A डाके
No comments:
Post a Comment
हा ब्लॉग राजकीय, सामाजिक चालू घडामोडी, विनोदी किस्से, ललित कथा, टोमणे या साठी आहे.. वाचा, आवडलं, नाही पटलं, तर कंमेंट्स करा.. तुमच्या कंमेंट्स अपेक्षित आहेत.. धन्यवाद..!