Wednesday, November 30, 2016

फिरका वासा


लहानपणी आम्ही नूसते भटकायचो... पोर पण (मित्र) वाढीव होती.. नागझरी बाग नवीनच झाली होती..  उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे  सकाळी  पोर जे निघायची ती डायरेक्ट नागझरी बागेत.. नागझरी बाग कसबा पेठ आणि सोमवार पेठे च्या मध्ये.. कसब्यातल्या पोरांना चौक पार करून बागेत जावं लागायचं आणि सोमवारातली पोर भिंती वर उड्या मारून बागेत घुसायची .. पोर लाय आवली कसबा वाल्यानी नागझरी च्या अलीकडंचा ताबा घेतला होता आणि सोमवार वाल्यानी पलीकडंचा.. आणि मधून वाहायचा नागझरी नाला..  बरं नागझरी म्हणजे निर्मल, स्वच्छ नाही, घाणेरडा राडारोडा वाहून आणणारा गटार.. नाना पेठेतली दाढीवाले / टोपीवाले  कोंबड्या बकर कापून राहिलेला माल नागझरी टाकून द्यायचे, बऱ्याच घरांचं संडासचा पाणी नागझरी अव्याहतपणे वाहून न्यायची बिचारीच कामच ते.. आणि पोर स्टोर्या सांगायची पेशवेच्या म्हणे पेशवे नागझरीत अंघोळीला यायचे.. http://www.dnaindia.com/pune/report-nagzari-nala-among-pune-s-most-polluted-says-study-1693002 एवढी स्वच्छ नागझरी पेशवेच्या वेळी... बरं आता पेशवे यायचे म्हणून पोर पण मोठी टोपली टाकून त्यात बसायचे आणि इकडून तिकडं फिरायचे.. पेशवे असल्याचा फील यायचा.. बरं पोर सगळी चांगल्या घरातली पण नागझरी नाला लाय प्रिय सकाळ झाली कि बागेतच पळायची.. महानगरपालिकेनी  बाग पण नागझरी च्या  बाजूला केली त्यामुळं कधी न्हवं ते नागझरीला पोरानंमुळ महत्व आला.. 



पोरांचा एक म्होरक्या होता तो त्यांचा आदर्श.. आदर्श का ? तर दोनदा बोर्डिंग मधून पळून आला होता आणि एक दोन जणांना ठोकला होता.. पतंग भारी उडवायचा.. एकदा घर समोरच्या बिल्डिंग वर पतंग काढायला गेला तर गच्ची समोर घर असणाऱ्या म्हातारी नि गच्चीच दाराला कुलूप लावलं तर पट्ट्या पायपाला धरून खाली आला.. आणि पोरांनी खालून म्हातारीला ओरडून सांगितलं उडी मारली वरून तो मेला. म्हातारीला हार्ट अटॅक आला होता म्हातारी ला वाटलं आता आपण जातोय जेल मध्ये...

नागझरी बाग सकाळी  पोरांच्या ताब्यात  आणि रात्री भिकाऱ्यांच्या.. बरं भिकारी एकटे नाही आयटमला (भिकार्यांना पण आयटम असती) पण घेऊन यायचे रात्री.. सकाळी पोर लवकर बागेत गेली कि आयटम सकट भिकार्यांना हाकलून लावायचे.. लय येडी होती पोर...

एकदा बागेत सिगारेटची डुप्लिकेट माल टाकलेला दिसला.. एक आखा ट्रक भरून माल बागेत टाकला होता.. ब्रँड न्हवता लोकल माल होता.. पोरांना जसा माल दिसला तसं पोरांनी येडचाळा करायला सुरुवात केली ना.. तिथं पोरांना व्यसनं लागली ती काय अजून सुटली नाही... पोरांनी पाकीट खिशात भरू भरू घरी नेली आणि ठेवली कुठं संडासात, बुटात, जिन्यात जिथं जमल तिथं.. आता पोरांचा खेळ बदलला आधी पोर बागेत जाऊन क्रिकेट खेळ, कब्बडी खेळ, लिंगोरचा खेळ आता सकाळी उठलं कि बाग आणि बागेत गेलं कि व्हढं सिगारेटी... सिगारेटीचा माल उन्हाळा संपल एवढा होता मग काय रोज फुक्की बिडी.. आठवडा गेला, २ आठवडे गेले.. पोर बागेत गेली कि व्हढं सिगारेटी सकाळ दुपार संध्याकाळ नुसता धुरर..

नंतर काही दिवसांनी असाच डुप्लिकेट चॉकलेटेचा माल बागेत सापडला.. पोर आता सिगारेटी बरोबर चॉकलेटे खायला लागली.. घरी भरू भरू चॉकलेटी नेल्या... त्यात एक चांगलं होत कि गल्ली मध्ये मोठी पोर शहाणी होती लहान पोरानंवर लक्ष ठेवून असायची.. त्यातला एका मोठयाला टीप लागली कि पोर बागेत जाऊन येडचाळा करतात.. झालं आख्या गल्लीत पसरलं..  पोर चांगल्या घरची सगळी.. त्यांच्या आई बापांना सहन झालं नाही पोरांना तुडव तुडव तुडवला... आदर्श पासून सामान्य कार्यकर्त्या पर्यंत सगळ्यांना कचरा पेटी पाशी नागडा उभा केला.. येणारे जाणारे बघे हसत हसत जायचे.. लाय सॉल्लिड किस्सा झाला होता.. पण सुधारतील ती पोर कसली पोरांनी अड्डा बदलला... आता पोर FC Road, Deccan Choupati ला फिरतात...

No comments:

Post a Comment

हा ब्लॉग राजकीय, सामाजिक चालू घडामोडी, विनोदी किस्से, ललित कथा, टोमणे या साठी आहे.. वाचा, आवडलं, नाही पटलं, तर कंमेंट्स करा.. तुमच्या कंमेंट्स अपेक्षित आहेत.. धन्यवाद..!