Saturday, December 3, 2016

नशीब लक तकदीर प्राक्तन..


नशीब लक तकदीर प्राक्तन
या जगात हे शब्द प्रत्येक चांगल्या वाईट घडामोडी माग चिकटलेले आहेत..
माणूस मोठा छोटा होणं सगळं नशिबाशी जोडलेलं आहे आपण..!
माझं नशीबच खराब म्हणून मला ते मिळालं नाही, त्याच नशीब चांगलं म्हणून तो मोठा झाला..
एक मोटिवेशनल वाक्य पण आहे, "बुद्धीवादी लोक नेहमी नशीबवाल्या  कडे काम करताना दिसतात."
 

नशीब खरच असत का?

यश success हि नशिबाशी जोडलेली सगळ्यात मोठी गोष्ट आहे.. आणि ते काही प्रमाणात खरं पण आहे असं मी समजतो. नाहीतर ७ अब्ज लोकसंख्या असलेल्या जगात सगळ्यांनाच वाटत मला यश मिळावं, माझ्याकडे टोलेजंग घर पाहिजे, लक्झरी गाड्या पाहिजे, घरात १-२ किलो सोन पडून पाहिजे, बँकेत ३-४ करोड बॅलन्स पाहिजे असं स्वप्न सामान्य माणूस आयुष्यात एकदा न एकदा बघतोच, आणि या आशेवर राहतो कि एक न एक दिवस आपण हे सगळं मिळवू, मग जेव्हा प्रत्यक्षात कामाला लागतो तेव्हा एक-एक गोष्टी स्पष्ट होयला लागतात, बंगलाच स्वप्न फ्लॅट वर येत, लक्झरी गाडी च स्वप्न wagnor अल्टो वर येत. बँकेत असलेला बॅलन्स ५ डिजिट च्या पुढं काय जात नसतो.. मग हे करताना जेव्हा कळत कि आपण बघतो ती स्वप्न पूर्ण करायची असतील तर अजून काही तरी वेगळं केलं पाहिजे. इथे कितीही नशीब न मानणारा पण म्हणायला लागतो, आपलं नशीब खराब..! तरी एक आशा असते कि मिळेल.. 

नशिबाला विरुद्धार्थी शब्द हार्ड वर्क आहे.. पण जर खरच ७ अब्ज लोकांनी खूप हार्ड वर्क केला आणि त्यांना सगळ्यांना बँक बॅलन्स, सोन, ५-१० गुंठ्या मध्ये बंगला बांधायचा असेल तर एवढा सौर्स उभा राहील का? तर उत्तर आहे नाही.. ७ अब्ज लोकांना प्रत्येकी ५ गुंठ्या मध्ये जर घर बांधायचं असेल तर अजून एक ग्रह पृथ्वी शेजारी आणून ठेवावा लागल.. आणि बाकी लागणारी साधन तर वेगळीच..

नशीब माणूस जन्माला येतानाच घेऊन येतो हे वाक्य पुढील गोष्टी वरून आपण मानायला हरकत नाही.. माझा जन्म रस्त्यावर राहणाऱ्या भिकाऱ्याच्या घरी झाला असता तर ते माझं नशीबच.. आणि माझा जन्म जर मुकेश अंबानी च्या घरी झाला असता तरी हि ते माझं नशीबच.. इथे आपण असं नाही म्हणून शकत कि हे काय नशिबावर नसत... म्हणजे मी कोणाच्या घरी जन्म घायचा हे नशीबच ठरवत.. हे काही आपल्या हातात नाही.. 

हो पण माझा जन्म भिकाऱ्याच्या घरी झाला तरी मी भिकारी वरून किमान एक ५ आकडी कमावणारा सामान्य माणूस होऊ शकतो हे माझं हार्ड वर्क.. (किमान एवढं तरी प्रत्येकाच्या नशिबात असतंच..!).. म्हणजे कोणताही माणूस ३ वर्ष खूप हार्ड वर्क करून किमान एवढं मिळवू शकतोच ..

या सगळ्या गुंतागुंतीच्या लफड्या पासून लांब राहायचं असल तर आपण एक ठरवू शकतो, मला हार्ड वर्क करून जेवढं काही मिळेल त्यात मी लय खुश आणि समाधानी त्याच्या वर जर काही मला मिळवता आलं तर ते माझं नशीब..!  म्हणजे आता नशीब सुरु कुठून होतं तर हार्ड वर्क नंतर..!
मग मी कुठं पण जन्म घेऊ दे भिकाऱ्या कड किंवा अंबानी कड.. हार्ड वर्क आधी मग नंतर नशीब..!!!

काही गमतीशीर फोटो :-

हे दिसायला जरासे सेम असले तरी यांचं नशीब वेगळं आहे..
 
अब बारी अपनी है.. इनमें नशीब वाला कोण है और हार्ड वर्क वाला कोण है पेहचानने कि..?

Friday, December 2, 2016

चोथा स्तंभ

काल टीव्ही वर बातम्या बघत होतो. एक मराठी चॅनेलवाला कर्नाटकच्या चडचण ला जाऊन बस्ता खरेदी करणाऱ्यांचे बाईट घेत होता. बाईट घेणाऱ्या त्याला जे पाहिजे तेच समोरच्या कडून काढून घेत होता. २०-२५ जणांकडे जाऊन सारखं तेच विचारात होता कि तुम्हाला त्रास होतोय ना नोटबंदीचा? तुम्ही बँकेत जाऊन लाईनमध्ये उभे राहता, तुम्हाला एवढा त्रास होतो, लग्नाचा एवढा मोठा खर्च कसा मॅनेज करता?
लोक्स म्हणायचे काही त्रास नाही, मोदी साहेबांचा निर्णय उत्तम आहे.


चॅनेलवाला म्हणायचा, खरं खरं सांगा, मनापासून सांगा निर्णयामुळे तुम्हाला त्रास झाला ना..? लोक्स म्हणायचे नाही पहिले २ दिवस त्रास झाला पण आता सगळं काही सुरळीत आहे. काही लोकांच्या घरी २-२ लग्न होती त्यांना पण पैशाची चणचण नाही, असे लोकांकडून ऐकून त्याचं तोंड म्हशीच्या योनी वाणी झालं होत. तरी त्याच घोड पुढं दामटत होता. आता त्याला काय करावं कळंना झालं होत. लोक पद्धतशीर मारत होते. 


एवढ्यात अचानकपणे त्याचा चेहरा खुलला, हर्षोल्लीत झाला, गगनात आनंद मावेनासा झाला त्याला जस पाहिजे तसं गिर्हाईक मिळालं. ती एक स्त्री होती, कपाळाला हिंदू स्त्री सारखी टिकली कुंकू नाही, गळ्यात जाड काळे मणी च मंगलसूत्र त्यावरून त्यानी ओळखलं हि आपल्याच कळपातली  आहे. त्यानी केलं सुरु हिंदी मधून (त्याला वाटलं हिच्याशी हिंदी मधून बोललं तर आपली जवळीक आहे असं वाटेल, नशीब मराठी चॅनेल वर उर्दू सुरु केलं नाही). तिला विचारलं, "आपको क्या लगता है, मोदी का डिसिजन अछा है? तुम मुझे बटाओ ये ठीक किया क्या मोदीने?" ती बाया ५ सेकंड विचार करून बोलली अस्सल गावरान मराठीत, "ज्यो निर्णय घेतलाय मोदी सायबा न त्यो लय चांगलं हाय यानी तुमच्या आमच्या पोराबाळांच बघा पुढं लय चांगलं व्हनार आहे." आता चॅनेल वाल्याला काय करावं कळेना.. त्याच्या चेहरा डुक्करापेक्षा घाणेरडा झाला व्हता.. तिथून सटकला आणि दुसरी कड गिर्हाईक शोधाया गेला ४-५ गिर्हाईक उरकली त्यांच्याकडून  पण त्याला जे पाहिजे ते काढून घायचा प्रयत्न करत होता. हाती काही लागलं नाही मग...अचानक साक्षात ब्रह्मदेव प्रकटवा तसा एक दाढीवाला/टोपीवाला/बिना मुचवाला दिसला आता चॅनेलवालेला वाटलं आता आपल्याला जे पाहिजे ते मिळणार, आपला कलकत्ताला  बसलेला आनंद बाजार साहेब खुश होईल, हिच ब्रेकिंग न्यूस दाखवायची असे किडे डोक्यात सुरु झाले असणार.. मला पण २ से. वाटलं आता हा जिंकला.. त्यानी सुरु केलं, "भाईसाहब, आपको क्या लागत है? क्या फैसला गलत है या नही?" दाढीवाला जे काही म्हणाला ते ऐकून मला खरच त्याच कौतुक वाटलं. तो म्हणाला, "ये जो फैसला है उसका असर हमपे नाही बल्की काला पैसे जिंके पास है उनको पडेगा, इससे आचछा निर्णय अबसे पहिले कभी नाही हुआ.." आता चॅनेलवाल्याला हे सांगावंच लागलं कि नोटबंदी मुळे कुठंच कसल्या प्रकारचा त्रास होत नाही ये, सगळं काही सुरळीत चालू आहे, विरोधी पक्ष लोकांना त्रास होतोय असं सांगत आहेत त्याचा जरा सुद्धा मागमूस बाजारात दिसत नाहीये..

जाता जाता त्यानी गर्दी मध्ये घुसुन विचारलं, देशात आता जर निवडणूक झाल्या तर कोणाला मत द्याल..? एका सुरात सगळे उपस्थित म्हणाले मोदी ला ...!!


चॅनेलवाल्याची लोकांनी जिरवली याचा आनंद.. 

Thursday, December 1, 2016

पिल्लू, आई, बाबा आणि भावंडे..

नाकतोडे फॅमिली..

नाकतोडे फॅमिलीत नुकतंच एक पिल्लू जन्माला आलं...

आई : (अहो ऐकलंत का?) बाबा तुम्ही कुटुंब प्रमुख व्हा.. तुमचा भाऊ भ्रष्टाचारी आहे.
बाबा : हो..

पिल्लू : बाबा, लोकपाल आणा, काकाला सांगितलं त्यानी आणला नाही (मै भी पिल्लू.. तू भी पिल्लू.. अब तो सारा जहाँ है पिल्लू)
बाबा : हो..

पिल्लू : बाबा तुम्ही कुटुंब नीट चालवत नाही..
बाबा : बरं..
भावंड : बाबा, तुम्ही खूप छान कुटुंब प्रमुख आहात..

पिल्लू : भ्रष्टाचार संपवा
बाबा : बरं.. उद्या पासून १ पैसे आणि ५ पैसे बंद..
पिल्लू : हा अन्याय आहे.. बाबा तुम्ही भ्रष्टाचारी आहात.. (मनातल्या मनात : मी माझ्या भावंडांचे ढापलेले १ पैसे - ५ पैसे च काय करायचं आता?) 
भावंडं : छान केलंत बाबा..

पिल्लू : आज मी जेवणार नाही.. जेवायला आळी भात आणि गांडूळ रस्सा असेल तरच जेवणार..
बाबा : अल्ले माझ्या सोन्या, चल तिकडं कोपऱ्यात तुला भात रस्सा देतो
पिल्लू : जम्माडी गम्मत गम्माडी जम्मत...
बाबा : लाँप्प लॅप लाँप्प लॅप ल ल प

आई  (फुल्ल पॅन्ट घालून) : १२५ भावंडा मधलं एक पिल्लू त्रास द्यायचं.. १२४ भावंडांचं भविष्य चांगलं हवं म्हणून पिल्लू खाऊन टाकलं..


तात्पर्य : विचित्र मागणी करणारा एक पण जीव जगात काम नये...

-- Dake

लग्न - प्रेम, ठरवून केलेलं आणि लिव्ह इन

पृथ्वीवर लग्न हा विषय लय हार्ड आहे.. दुसऱ्या ग्रहावर असं काही असेल असं वाटत नाय , असला तरी प्रेम, ठरवून आणि लिव्ह इन असं काही असेल असं वाटत नाय. आता विषय राहतो वादाचा या पैकी बेस्ट ऑपशन कुठला? तर याला पण  काय तात्विक आधार नाय. असला तरी तो लोक्स त्यांच्या त्यांच्या हिशोबानी हाच  बेस्ट असा घेतात.

आता विज्ञान science शास्त्र काय सांगत बघू :-
प्रेम उत्पन्न होयला दोन्ही बाजू (पंटर आणि आयटम) यांच्या हार्मोन्स च्या उद्दीपन चा काळ एकच पाहिजे म्हणजे दोघे पण घोड्यावर स्वार पाहिजे एकाच घोडं जरी अडलं तर मग फिस्कटलं.
त्यामुळं दोघांचा घोडा कसा पळतोय यावर ते असत.. बरं दोन्ही घोडे फास्ट असतील तर जिथं पर्यंत पाहिजे तिथं पर्यंत पोचला कि रेस जिंकली. त्यानंतर ज्याच्या त्याच्या समजुतीनं पुढं जाऊ शकतात.. म्हणजे प्रेमात दोन्ही घोडे तर्रर्रर्रर्र पाहिजे नाहीतर रेस हरली. या रेस मध्ये सध्या खूप लोक्स आपले घोडे पळवत आहे. संख्या शास्त्रनुसार हाच विषय मोठा अवघड होऊन जातो. हार्मोन्स उदिप्त असले तरी १० (इथं चॉईस साठी माझी आवडती संख्या १० तुम्ही ४२ ९० १०० पण घेऊ शकता) पैकी १ लाच निवडायचा असतो (संस्कार वाले पोर असं करतात; नाहीतर १० पैकी १० ची पण सध्या चलती आहे).
इथे ऑपशन कमी आणि त्रास जास्त असतो, १०तुन १, मग १काला रोज २ तास भेट.. ४ तास व्हाट्सएप, विक मधून १दा जम्माडी जम्मत गम्माडी गम्मत, ५००-१००० ची लाल पत्ती असा सगळा संख्या शास्त्रचा नियम इथं येतो. हा सगळा लफडा कशा साठी हार्मोन्स उदिप्त झाले म्हणून त्यांना शांत करण्यासाठी..ठरवून केलेला विवाह तर लय भलताच प्रकार आहे (हा फक्त उरलेल्या सिंगल लोकांसाठी असतो आणि ज्यांचे घोडे वर अडतात ते पण)
इथं शास्त्र science विज्ञान आधी येत नाही. इथं कॉमर्स आधी येत. बघा बघी, कांडा पोहे, देवाण घेवाण, इम्पोर्ट एक्स्पोर्ट असले प्रकार इथं सुरुवातीला असतात.. त्यानंतर हार्मोन्स वैगरे.. आणि हा प्रकार सगळं ठरवून प्लांनिंग नि केला जातो. जेवढं प्लांनिंग जोरात तेवढा success रेट जबरी. ब्रेक इव्हन पॉईंट आला कि सगळं काही सुरळीत चालू.. प्रॉडक्ट/ प्रोडक्टस तयार असतात.. हा एक सेलेकशन फंडा आहे.. सिलेक्शन जमलं तर कंपनी जोरात चालू राहते..

लिव्ह इन मध्ये असं काय नसत.. प्रेम नाय ठरवून नाय नुसता टाईमपास.. हार्मोन्स उदिप्त झाले कि भेट शांत झाले कि दे कल्टी असा साधा सोपा फंडा.. मनात आला कि भेटायचं चहा कॉफे वर काम भागत.

आता निसर्गानी जस जमल तस सगळ्या प्राण्यांना लग्न चा विषय सोपवला आहे.. माणूस सोडला तर सगळे प्राणी लिव्ह इन मध्ये राहतात.. कुठलीही कंमिटमेन्ट नाही, भाजी साडी दागिने पगार वरून भांडण नाही, तूला  माझी नखपॉलिश आवडली नाही तुझं माझ्या वर प्रेम नाही असला कुठलाही फालतूपणा नाही, लग्नाचा खर्च नाही सगळं कस सुट्टं सुट्टं..

आता जास्त मीठ खाल्लं तर चांगलं नाही आणि कमी खाल्लं तर आयोडीन मिळत नाही त्यामुळे मधला मार्ग काय तर थोडं खा.. बघा आपला हिशोब कुठं लागतोय ते

-- मी A डाके

Wednesday, November 30, 2016

फिरका वासा


लहानपणी आम्ही नूसते भटकायचो... पोर पण (मित्र) वाढीव होती.. नागझरी बाग नवीनच झाली होती..  उन्हाळ्याची सुट्टी म्हणजे  सकाळी  पोर जे निघायची ती डायरेक्ट नागझरी बागेत.. नागझरी बाग कसबा पेठ आणि सोमवार पेठे च्या मध्ये.. कसब्यातल्या पोरांना चौक पार करून बागेत जावं लागायचं आणि सोमवारातली पोर भिंती वर उड्या मारून बागेत घुसायची .. पोर लाय आवली कसबा वाल्यानी नागझरी च्या अलीकडंचा ताबा घेतला होता आणि सोमवार वाल्यानी पलीकडंचा.. आणि मधून वाहायचा नागझरी नाला..  बरं नागझरी म्हणजे निर्मल, स्वच्छ नाही, घाणेरडा राडारोडा वाहून आणणारा गटार.. नाना पेठेतली दाढीवाले / टोपीवाले  कोंबड्या बकर कापून राहिलेला माल नागझरी टाकून द्यायचे, बऱ्याच घरांचं संडासचा पाणी नागझरी अव्याहतपणे वाहून न्यायची बिचारीच कामच ते.. आणि पोर स्टोर्या सांगायची पेशवेच्या म्हणे पेशवे नागझरीत अंघोळीला यायचे.. http://www.dnaindia.com/pune/report-nagzari-nala-among-pune-s-most-polluted-says-study-1693002 एवढी स्वच्छ नागझरी पेशवेच्या वेळी... बरं आता पेशवे यायचे म्हणून पोर पण मोठी टोपली टाकून त्यात बसायचे आणि इकडून तिकडं फिरायचे.. पेशवे असल्याचा फील यायचा.. बरं पोर सगळी चांगल्या घरातली पण नागझरी नाला लाय प्रिय सकाळ झाली कि बागेतच पळायची.. महानगरपालिकेनी  बाग पण नागझरी च्या  बाजूला केली त्यामुळं कधी न्हवं ते नागझरीला पोरानंमुळ महत्व आला.. पोरांचा एक म्होरक्या होता तो त्यांचा आदर्श.. आदर्श का ? तर दोनदा बोर्डिंग मधून पळून आला होता आणि एक दोन जणांना ठोकला होता.. पतंग भारी उडवायचा.. एकदा घर समोरच्या बिल्डिंग वर पतंग काढायला गेला तर गच्ची समोर घर असणाऱ्या म्हातारी नि गच्चीच दाराला कुलूप लावलं तर पट्ट्या पायपाला धरून खाली आला.. आणि पोरांनी खालून म्हातारीला ओरडून सांगितलं उडी मारली वरून तो मेला. म्हातारीला हार्ट अटॅक आला होता म्हातारी ला वाटलं आता आपण जातोय जेल मध्ये...

नागझरी बाग सकाळी  पोरांच्या ताब्यात  आणि रात्री भिकाऱ्यांच्या.. बरं भिकारी एकटे नाही आयटमला (भिकार्यांना पण आयटम असती) पण घेऊन यायचे रात्री.. सकाळी पोर लवकर बागेत गेली कि आयटम सकट भिकार्यांना हाकलून लावायचे.. लय येडी होती पोर...

एकदा बागेत सिगारेटची डुप्लिकेट माल टाकलेला दिसला.. एक आखा ट्रक भरून माल बागेत टाकला होता.. ब्रँड न्हवता लोकल माल होता.. पोरांना जसा माल दिसला तसं पोरांनी येडचाळा करायला सुरुवात केली ना.. तिथं पोरांना व्यसनं लागली ती काय अजून सुटली नाही... पोरांनी पाकीट खिशात भरू भरू घरी नेली आणि ठेवली कुठं संडासात, बुटात, जिन्यात जिथं जमल तिथं.. आता पोरांचा खेळ बदलला आधी पोर बागेत जाऊन क्रिकेट खेळ, कब्बडी खेळ, लिंगोरचा खेळ आता सकाळी उठलं कि बाग आणि बागेत गेलं कि व्हढं सिगारेटी... सिगारेटीचा माल उन्हाळा संपल एवढा होता मग काय रोज फुक्की बिडी.. आठवडा गेला, २ आठवडे गेले.. पोर बागेत गेली कि व्हढं सिगारेटी सकाळ दुपार संध्याकाळ नुसता धुरर..

नंतर काही दिवसांनी असाच डुप्लिकेट चॉकलेटेचा माल बागेत सापडला.. पोर आता सिगारेटी बरोबर चॉकलेटे खायला लागली.. घरी भरू भरू चॉकलेटी नेल्या... त्यात एक चांगलं होत कि गल्ली मध्ये मोठी पोर शहाणी होती लहान पोरानंवर लक्ष ठेवून असायची.. त्यातला एका मोठयाला टीप लागली कि पोर बागेत जाऊन येडचाळा करतात.. झालं आख्या गल्लीत पसरलं..  पोर चांगल्या घरची सगळी.. त्यांच्या आई बापांना सहन झालं नाही पोरांना तुडव तुडव तुडवला... आदर्श पासून सामान्य कार्यकर्त्या पर्यंत सगळ्यांना कचरा पेटी पाशी नागडा उभा केला.. येणारे जाणारे बघे हसत हसत जायचे.. लाय सॉल्लिड किस्सा झाला होता.. पण सुधारतील ती पोर कसली पोरांनी अड्डा बदलला... आता पोर FC Road, Deccan Choupati ला फिरतात...

Friday, January 17, 2014

TechNation-2014

TechNation 2014
organized by
IT-Milan
OverView 

Day 1: Saturday 18th Jan 2014
(1.30PM-5.30PM)
Day 2: Sunday 19th Jan 2014
(8.00AM-1.00PM)
 • Inauguration by various faculties of various colleges
 • Fun with HR Games
 • Technical Workshop on Wireless technology by Mukund Bhopale
 • Key Note Address by Atul Kahate.
 • A journey to professional programmer from college programmer
 • A Story of Facebook : A BIG Data

 • Concluding Talk : IT for Nation! 
Venue: P. L. Gawade Sabhgriha, Bhave High School, Pune - 411030.
Registration Fee : Rs. 50
For more details and registration,
Please click here.

 

Saturday, March 16, 2013

All Essential Computer Terms.... (Operating System)

Hi guys, Here i will discuss with you essential computer terms. I hope it will be very useful for you. Lets start with one of the hot topic of computer i.e. Operating System.
I have realized one thing when i share my knowledge with my friends, we learn lots of computer terms but we cannot recall these when we need. So, Lets start...

Operating System :-  
The operating system is the most important program that runs on a computer. Every general-purpose computer must have an operating system to run other programs. Operating systems perform basic tasks, such as recognizing input from the keyboard, sending output to the display screen, keeping track of files and directories on the disk, and controlling peripheral devices such as disk drives and printers.

For large systems, the operating system has even greater responsibilities and powers. It is like a traffic cop -- it makes sure that different programs and users running at the same time do not interfere with each other. The operating system is also responsible for security, ensuring that unauthorized users do not access the system.

Operating systems can be classified as follows:

 • Multi-user: Allows two or more users to run programs at the same time. Some operating systems permit hundreds or even thousands of concurrent users.
 • Multiprocessing : Supports running a program on more than one CPU.
 • Multitasking : Allows more than one program to run concurrently.
 • Multithreading : Allows different parts of a single program to run concurrently.
 • Real time: Responds to input instantly. General-purpose operating systems, such as DOS and UNIX, are not real-time.

 •  
  Operating systems provide a software platform on top of which other programs, called application programs, can run. The application programs must be written to run on top of a particular operating system. Your choice of operating system, therefore, determines to a great extent the applications you can run. For PCs, the most popular operating systems are DOS, OS/2, and Windows, but others are available, such as Linux. As a user, you normally interact with the operating system through a set of commands. For example, the DOS operating system contains commands such as COPY and RENAME for copying files and changing the names of files, respectively. The commands are accepted and executed by a part of the operating system called the command processor or command line interpreter. Graphical user interfaces allow you to enter commands by pointing and clicking at objects that appear on the screen.


  network operating system

  Abbreviated as NOS, an operating system that includes special functions for connecting computers and devices into a local-area network (LAN). Some operating systems, such as UNIX and the Mac OS, have networking functions built in. The term network operating system, however, is generally reserved for software that enhances a basic operating system by adding networking features. Novell Netware, Artisoft's LANtastic, Microsoft Windows Server, and Windows NT are examples of an NOS.
    
  mobile operating system


  A mobile operating system, also called a mobile OS, is an operating system that is specifically designed to run on mobile devices such as mobile phones, smartphones, PDAs, tablet computers and other handheld devices. The mobile operating system is the software platform on top of which other programs, called application programs, can run on mobile devices.